खासदार उदयनराजे भोसले साताऱ्यात, पोलिसांसमोर हजर होण्याची शक्यता

खासदार उदयनराजे भोसले साताऱ्यात, पोलिसांसमोर हजर होण्याची शक्यता

सातारा –  साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले शुक्रवारी  रात्री साताऱ्यात दाखल झाले. उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्या नंतर पहिल्यांदाच उदयनराजे साताऱ्यात दाखल झाले आहे. आज भोसले पोलिसांसमोर हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना आता अटक होणार का याकडे सगळ्याचं लक्ष लागलंय.

लोणंद येथील सोना अलाईज कंपनीचे मालक राजकुमार जैन यांना खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी उदयनराजे भोसले यांच्यावर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणात 9 जणांना अटक करण्यात आली आहे. दोनच दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला होता. अटकेच्या कारवाईमुळे उदयनराजे गेल्या काही दिवसांपासून फरार होते.

दरम्यान, शुक्रवारी रात्री उदयनराजे भोसले साताऱ्यात दाखल झाले आहे. त्यांच्या समर्थकांनी मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलंय. आता उदयनराजे स्वत: पोलिसांना शरण जातात की त्यांना अटक होते याकडे सगळ्याचं लक्ष लागलंय.

COMMENTS