अहमदाबादमध्ये नारायण राणे – अमित शहा यांच्या भेटीचे खंडण

अहमदाबादमध्ये नारायण राणे – अमित शहा यांच्या भेटीचे खंडण

मुंबई – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यात अहमदाबादमध्ये भेट झाल्याची बातमी काही चॅनलवर सुरू आहे. या बातमीचं राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी खंडण केलंय. नारायण राणे यांचा अहमदाबाद दौरा हा व्यक्तीगत कामासाठी होता. सिंधुदुर्गात आम्ही लवकरच मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल सुरू करीत आहोत. त्यासाठी काही उपकरणांची पहाणी करण्यासाठी राणे अहमदाबादला गेले असं नितेश राणे यांचं म्हणणं आहे. आपणही राणेंसाहेबांसोबत होतो असंही नितेश यांनी सांगितलं. काल संध्याकाळी विमानाने गेलो आणि विमानाने परत आलो. लपवाछपवी करायची असती तर खाजगी विमानाने गेलो असतो असंही नितेश यांनी सांगितलं.

COMMENTS