आमदार रमेश कदमांना दणका; 135 कोटींची मालमत्ता जप्तीचे आदेश

आमदार रमेश कदमांना दणका; 135 कोटींची मालमत्ता जप्तीचे आदेश

अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे निलंबित आमदार रमेश कदम यांना मुंबई सत्र न्यायालयाने दणका दिला आहे. कदम यांची 135 कोटींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार आमदार रमेश कदम यांची 135 कोटी 16 लाख 82 हजार 608 रुपयांची मालमत्ता गुन्हे अन्वेषण विभाग जप्त करणार आहे. त्यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता असलेल्या शेती, प्लॉट, कपेडर रोड येथील प्लॉट औरंगाबाद येथील मालमत्ता आणि 20-25 बँक खाती अशा एकूण 54 मालमत्ता जप्त करण्याचे आदेश न्यायमूर्ती टंकीवाला यांनी दिले आहेत. त्यामुळे कदम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

COMMENTS