उत्तर महाराष्ट्रातील जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निकाल

उत्तर महाराष्ट्रातील जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निकाल

नाशिकमध्ये 20 वर्षानंतर सेनेचा भगवा फडकला…

शिवसेनेचा भाजपला धक्का

नाशिक जिल्हा परिषदेवर अखेर  तब्बल 20 वर्षांनंतर शिवसेनेचा भगवा फडकला.शिवसेनेच्या शीतल उदय सांगळे यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष तर कॉंग्रेसच्या नयना गावित यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.शीतल सांगळे यांनी भाजपच्या उमेदवार मंदाकिनी बनकर यांचा 2 मतांनी पराभव केला.या निवडणुकीत शिवसेनेच्या शीतल सांगळे यांना 37 तर विरोधी उमेदवार मंदाकिनी बनकर याना  35 मते मिळाली.

कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला होता.भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेस आणि माकप यांनी शिवसेनेला पाठिंबा देत आघाडी केली.त्यामुळे शिवसेनेचे 25,कॉंग्रेस 8 ,माकप 3 आणि अपक्ष 1 अशी 37 मतांची जुळणा करत शिवसेनेने भाजपला मात दिली. या निवडणुकीत 1 सदस्य तटस्थ राहिला.

 

 

जळगाव जिल्हा परिषद 

 

अध्यक्ष – उज्वला पाटील, भाजप

उपाध्यक्ष – नंदकिशोर महाजन, भाजप

युती/आघाडी – भाजपने काँग्रेसची मदत घेतली

COMMENTS