उदयनराजेंच्या अटकेच्या निषेधार्थ साता-यात बंद !

उदयनराजेंच्या अटकेच्या निषेधार्थ साता-यात बंद !

सातारा – खासदार उदयनराजे भोसले यांच्या अटेकेचे पडसाद आता सातारा जिल्ह्यात उमटू लागले आहेत. अटकेच्या निषेधार्थ शहरातल्या व्यापा-यांनी बंद पाळला आहे. बाजारपेठेसह शहरातील इतर ठिकाणची दुकाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात येत आहेत. अटकेच्या पार्श्वभूमीवर साता-यात पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे. दरम्यान खासदार उदयनराजे दुपारी ३ वाजता जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी हजर राहणार आहेत.

COMMENTS