उद्धव ठाकरे आज विदर्भ दौ-यावर

उद्धव ठाकरे आज विदर्भ दौ-यावर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज शिवसंपर्क अभियानांतर्गत सुरू असलेल्या विदर्भ दौ-यावर येत आहेत. सोमवारी सकाळी 10 वाजता अकोला येथे पश्चिम विदर्भातील आमदार, नेते, कार्यकर्ते आणि पदाधिका-यांची उद्धव ठाकरे भेट घेणार आहेत. या भेटीत ते पश्चिम विदर्भातील समस्या व त्यावरील उपाययोजना यांची माहिती घेतील. तसंच आमदार आणि पदाधिका-यांसोबत चर्चा करणार आहेत. पक्षसंघटन मजबूत करण्याच्या उद्देशानेही या दौ-याकडं पाहिलं जातंय. मराठवाड्याचा शिवसंपर्क दौरा आमदारांच्या गैरहजेरीमुळं  चांगलाच अपयशी ठरला. त्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून या दौरा तरी यशस्वी करण्यासाठी जोराचे प्रयत्न केले जात आहेत.

COMMENTS