कामगारांना कामावरुन काढले; कंपनीविरोधात आ. बच्चू काडू आक्रमक

कामगारांना कामावरुन काढले; कंपनीविरोधात आ. बच्चू काडू आक्रमक

वर्धा –  आमदार बच्चू कडू यांचा कामगाराना विषयी लढा पुन्हा पेटला आहे. वर्ध्यात गेल्या दोन वर्षात 36 कामगारांना कामावरुन कमी करण्याच्या निर्णयावर उत्तम गॅल्वा कंपनीच्या प्रशासनासोबत चर्चेसाठी गेलेले आमदार बच्चू कडूंचा राग अनावर झाला.

यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी थेट कंपनीच्या अधिकाऱ्यांवरच पाण्याची बॉटल भिरकावली . यादरम्यान आपला रोष व्यक्त करत कंपनी परिसरात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. वाद इतके पेटले की मध्यस्त म्हणून कंपनीला पोलिसांना बोलवावे लागले. त्यानंतर पोलिसांनी आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना धक्का देत कंपनीच्या बाहेर काढले.

वर्ध्यातील उत्तम गॅल्वा कंपनीने गेल्या दोन वर्षांपासून 36 कामगारांना कामावरुन कमी केले. त्यामुळे कामगारावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना रोजगार नाही त्याच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह कसा होणार? या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आमदार बच्चू कडू गेले असता उत्तम गॅल्वा कंपनीच्या प्रशासनाने चर्चा करण्यास नाकारले .यावर आमदार बच्चू कडू संतापले.

कंपनीतून निघणाऱ्या रासायनिक पाण्यामुळे लगतच्या गावकऱ्यांना दूषित पाणी प्यावे लागते. यावरुन कंपनीच्या अधिकाऱ्यावर बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनी पाण्याची बॉटल फेकून मारली. पोलिसांनी कंपनीबाहेर काढल्यानंतर आमदार बच्चू कडू आणि कार्यकर्त्यांनी कंपनी बाहेर ठिय्या आंदोलन सुरु केलं. येत्या आठ दिवसात मागण्या मान्य न झाल्यास 25 हजार लोकांच्या उपस्थितीत आंदोलन करण्याचा इशारा यावेळी बच्चू कडू यांनी कंपनीला दिला आहे.

COMMENTS