खासदार रविंद्र गायकवाड आज संसदेत हजर राहणार

खासदार रविंद्र गायकवाड आज संसदेत हजर राहणार

दिल्ली – एअर इंडियाच्या कर्मचा-याला मारहाण करण्याचा आरोप असलेले आणि त्यानंतर नॉटरिचेबल असलेले शिवसनेचे उस्मानाबादचे खासदार रविंद्र गायकवाड आज संसदेच्या कामकाजात सहभागी होणार आहेत. मारहाण प्रकरणानंतर विमान कंपन्यांनी गायकवाड यांना विमान प्रवेशाला बंदी घातली होती. त्याविरोधात शिवसेनेनं लोकसभा आणि राज्यसभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल केला होता. आज हक्कभंग स्विकारला नाही तर शिवसेना खासदार आक्रमक होऊन सरकारला जाब विचारणार आहेत. या प्रकरणी आक्रमक होण्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिरवा कंदील दिला आहे.

मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यातील तणावलेल्या संबंधामुळेच रविॅद्र गायकवाड प्रकरणी सरकारने अद्याप कोणताही दखल घेतली नाही. दहा दिवसानंतरही गायकवाड यांच्यावरील प्रवास बंदी हटवण्यात आली नाही. त्यामुळे आज संसदेत शिवसेना खासदार आक्रमक होतील. तसेच रविॅद्र गायकवाड प्रकरणी तडजोड झाली तरच एनडीए १० तारखेच्या बैठकीला शिवसेनेचा जाण्याचा मूड आहे. अन्यथा एनडीए बैठकीवर बहिष्कार घालण्याची शक्यता आहे.

COMMENTS