घर विक्री करताना शाकाहारी-मांसाहारी भेद केल्यास मनसे स्टाईलने धडा शिकवू

घर विक्री करताना शाकाहारी-मांसाहारी भेद केल्यास मनसे स्टाईलने धडा शिकवू

शहरात घर विक्री करताना शाकाहारी-मांसाहारी असा भेद करू नका, अन्यथा मनसे स्टाईल धडा शिकवू, असा इशारा मनसेने मुंबईतील सर्व बिल्डरांना दिला आहे. मुंबईत घर विक्री करताना शाकाहारी किंवा मांसाहारी असा भेद केला जाणार नाही, अशी आम्हाला हमी द्या. जर आम्हाला याबाबत हमी मिळाली नाही, तर मनसे स्टाईलमध्ये आंदोलन करण्यात येईल. असे पत्रच मनसेने सर्व बिल्डरांना धाडले आहे.

दरम्यान, 2015 मध्ये दहिसरमध्ये मांसाहार करणाऱ्या कुंटुंबाला सोसायटीतील लोकांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. तेव्हाही मनसेने आंदोलन केले होतं. त्यामुळे शाकाहारी-मांसाहारीच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा मनसे आक्रमक होताना दिसते आहे.

COMMENTS