डबेवाला पुतळ्याचे अखेर अनावरण

डबेवाला पुतळ्याचे अखेर अनावरण

हाजीअली चौकात डबेवाल्याच्या शिल्पाचे (पुतळा) अनावरण अखेर  आज महानगरपालिका अजॉय मेहता आयुक्त यांचे हस्ते करण्यात आले.  या वेळी खेड-आळंदीचे आमदार सुरेश गोरे, आरपीजी  ग्रुपचे अध्यक्ष हर्ष गोयंका, डबेवाले संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब करवंदे उपस्थित होते.

अवीरत पणे काम करणारा डबेवाला सध्या प्रखर अशा उन्हाला तोंड देत आहे. डबेवाले दुपारचे जेवण कार्यालयात पोचवत असल्यामुळे त्याचे मुख्य काम हे भर दुपारीच असते अशा वेळी उन्हाचा कहर झालेला असतो. त्याचा त्रास डबेवाल्यांना निश्चित होत आहे. जवळ जवळ पन्नास साठ किलो वजनाची चळत डोक्यावर असते अथवा सायकलला लावलेली असते. डबेवाल्यांना उन्हाचा त्रास कमीत कमी व्हावा यासाठी महानगरपालिका आयुक्त अजॉय मेहता  यांना निवेदन देण्यात आले. या मध्ये जेथे शक्य आहे तेथे डबेवाल्यांच्या बदली जागेवर उन्हा पासुन बचाव होण्यासाठी महानगर पालिकेच्यावतीने शेड बांधावी अशी विनंती करण्यात आली आहे.

दरम्यान,  आचारसंहितेमुळे या पुतळ्याचे अनावरण होऊ शकलं नव्हतं त्यामुळे आता तब्बल दोन महिन्यांनंतर पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

COMMENTS