दाऊद इब्राहिम ‘फिट अँड फाईन’- छोटा शकील

दाऊद इब्राहिम ‘फिट अँड फाईन’- छोटा शकील

‘दाऊदभाई बरा आहे. त्याची तब्येत ठणठणीत आहे,’ अशी माहिती शकीलने’ एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना दिली आहे. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन व मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिमचा मृत्यू झाल्याचे वृत्त दाऊदचा खास हस्तक छोटा शकील याने फेटाळलं आहे.

पाकिस्तानातील काही वृत्तवाहिन्यांनी दाऊद गंभीर आजारी असून कराचीतील एका रुग्णालयात त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचं वृत्त दिले होते. त्यानंतर काही वेळातच दाऊद मरण पावल्याची चर्चा सुरू झाली. दा

दाऊदला हृदयविकाराचा झटका आला. त्यातच तो गेला, असे बोलले जात होते. ही चर्चा सुरू होताच छोटा शकीलने या वृत्तपत्राच्या प्रतिनिधीला फोन करून दाऊद बरा असल्याचे सांगितले. ‘मीडियात येणाऱ्या बातम्या खोट्या आहेत. भाई एकदम फिट आणि फाइन आहे. माझा आवाज ऐका. त्यावरून असे काही झाले असेल असे तुम्हाला वाटते का?,’ असा प्रश्नही त्यानं केला.

COMMENTS