दिग्गजांच्या उपस्थितीत नितीन गडकरी यांचा षष्ठ्यब्दीपूर्ती सोहळा

दिग्गजांच्या उपस्थितीत नितीन गडकरी यांचा षष्ठ्यब्दीपूर्ती सोहळा

नागपूर – भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांचा षष्ठ्यब्दीपूर्ती सोहळा आज (शनिवार) सायंकाळी आयोजित करण्यात आला आहे. कस्तूरचंद पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला अनेक बडे नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नितीन गडकरी षष्ठ्यब्दीपूर्ती गौरव समारोह समिती स्थापन करण्यात आली आहे. हा सोहळ्यासाठी उभारण्यात आलेले मुख्य व्यासपीठ भव्य असून, अत्याधुनिक आहे. व्हीआयपींच्या वेटिंगसाठी स्टेजच्या मागच्या बाजूला अनेक डोम उभारण्यात आलेले आहेत. जवळपास 30 हजार लोकांसाठी कस्तूरचंद पार्कवर व्यवस्था करण्यात आली आहे. किमान 5 हजार व्हीआयपींसाठी बसण्याची व्यवस्था आहे. याशिवाय ठिकठिकाणी स्क्रिनची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

 

यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, श्री श्री रविशंकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, शिवसेनेचे नेते तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह देशभरातील सर्वपक्षीय नेते गडकरींना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

 

COMMENTS