नरेंद्र मोदींनी केले आदित्य ठाकरे यांचे अभिनंदन, आदित्य यांनी मानले आभार !

नरेंद्र मोदींनी केले आदित्य ठाकरे यांचे अभिनंदन, आदित्य यांनी मानले आभार !

एकीकडे शिवसेना आणि भाजप यांच्यात कमालीचा तणाव निर्माण झाला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचं अभिनंदन केलं आहे. स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवल्याबद्दल मोदी यांनी ट्विट करुन आदित्य ठाकरे यांचं अभिनंदन केलं आहे. माझ्या तरुण मित्रा स्वच्छात अभिनायात सहभागी झाल्याबद्दल अभिनंदन असं मोदींनी ट्विट करुन म्हटलं आहे. त्यावर आदित्य यांनीही तातडीने रिट्विट करत मोदी यांचे आभार मानले आहेत. दोन्ही पक्षातील तणावर, भाजप विरोधात निर्माण होत असलेला रोष या पार्श्वभूमीवर शिवसेनेला चुचकारण्याचा तर हा प्रयत्न नव्हे ना असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

COMMENTS