नारायण राणेंचा पक्ष स्थापना आणि एनडीएतील सहभागावर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया !

नारायण राणेंचा पक्ष स्थापना आणि एनडीएतील सहभागावर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया !

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख यांनी आज अचानक तातडीची पत्रकार परिषद बोलावली होती. त्यामुळे साहाजिकच तिथे मीडियाच्या प्रतिनिधीनीं मोठी गर्दी केली होती. नारायण राणे यांचा पक्ष आणि त्याचा एनडीएमधील सहभाग यावर उद्धव प्रतिक्रिया देतील असा सर्वांनीच अंदाज बांधला होता. त्यांचा अंदाज काही प्रमाणात खरा ठरला. उद्धव यांची पत्रकार परिषद ही मुख्यत्वे काल सरकारने जीएसटी संदर्भात घेतलेल्या निर्णयावर होती.

पत्रकार परिषद संपताना उद्धव यांना पत्रकारांनी दोन वेळा नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि त्याचा एनडीएमधील सहभाग या विषयी प्रश्न विचारला. मात्र आपण आज आपण एखाद्या राजकीय व्यक्तीच्या जीवन मरणाविषयी काहीही बोलणार नाही असं सांगत राणेंना अप्रत्यक्षपणे टोला मारला. त्यामुळे राणेंचा एनडीए प्रवेश आणि मंत्रीमंडळातील संभाव्य सहभाग याविषयी शिवसनेनेची  नेमकी भूमिका काय हे मुद्दे गुलदस्त्याच राहिले आहेत.

COMMENTS