पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निकाल

पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निकाल

कोल्हापूर झेडपी: भाजपच्या शौमिका महाडिक अध्यक्षपदी तर सेनेचे सर्जेराव पाटील उपाध्यक्ष

 

कोल्हापूरच्या जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत अखेर भाजपने बाजी मारली आहे.भाजपचे आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी शौमिका महाडिक यांची अध्यक्षपदी तर सेनेचे सर्जेराव पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.

भाजपच्या शौमिका महाडिक यांनी कॉंग्रेसच्या बंडा माने यांचा 9 मतांनी पराभव केला.त्यांना 37 मते मिळाली तर विरोधी उमेदवार बंडा माने यांना 27 मते मिळाली.हाच फॉर्म्युला उपाध्यक्ष निवडीवेळीही कायम राहिल्याने शिवसेनेच्या सर्जेराव पाटील यांनी राष्ट्रवादीच्या जयवंत शिंपी यांचा तितक्याच फरकाने पराभव केला. अध्यक्ष  शौमिका महाडिक भाजप आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी आहे.

सोलापूर जिल्हा परिषद 

झेडपी अध्यक्षपदी भाजप-महाआघाडीचे उमेदवार संजय शिंदे, तर उपाध्यक्षपदी शिवानंद पाटील यांची बिनविरोध निवड. मोहिते पाटलांच्या नेतृत्वास मोठा सुरूंग, जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार. संजय शिंदे अध्यक्ष – भाजप पुरस्कृत – राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांचे भाऊ…

 

सातारा जिल्हा परिषद

राष्ट्रवादीचे संजीवराजे नाईक-निंबाळकर अध्यक्ष , वसंतराव मानकुमारे उपाध्यक्ष म्हणून अधिकृत झाली घोषणा.

अध्यक्ष – संजीवराजे नाईक निंबाळकर – विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे भाऊ

संजीवराजे नाईक-निंबाळकर

 

सांगली जिल्हा परिषद

अध्यक्ष – संग्रामसिंह देशमुख (भाजप) – भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचे भाऊ

उपाध्यक्ष – सुहास बाबर (शिवसेना) – शिवसेना आमदार अनिल बाबर यांचा मुलगा

 

पुणे जिल्‍हा परिषद

अध्यक्ष विश्वास उर्फ नाना देवकाते, राष्ट्रवादी तर उपाध्यक्ष विवेक वळसे- पाटील

राष्ट्रवादी मोठा पक्ष – राष्ट्रवादी 44

 

अहमदनगर जिल्हा परिषद

अध्यक्षपदी काँग्रेसच्या शालिनी विखे-पाटील, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या राजश्री घुले

शालिनी विखे या विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांची पत्नी आहे.  उपाध्यक्ष  राजश्री घुले (राष्ट्रवादी) – चंद्रशेखर घुले यांच्या पत्नी

COMMENTS