पाकिस्तानच्या मंत्रिमंडळात हिंदू मंत्री !

पाकिस्तानच्या मंत्रिमंडळात हिंदू मंत्री !

इस्लामाबाद – पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद अब्बासी यांच्या मंत्रीमंडळात एका हिंदू मंत्र्याचा समावेश करण्यात आला आहे. खासदार दर्शन लाल यांची मंत्रीमंडळात वर्णी लागली आहे. शुक्रवारी अब्बासी मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. त्यामध्ये दर्शन लाल यांची मंत्रिमंडलात वर्णी लागली आहे. दर्शन लाल हे पेशाने डॉक्टर आहेत. अल्पसंख्याक कोट्यातून ते खासदार झाले आहेत. गेल्या 20 वर्षानंतर प्रथमच पाकिस्तानत कुठल्या हिंदू नेत्याची मंत्रीमडळात वर्णी लागली आहे.

COMMENTS