बुलेट ट्रेन केवळ दिखावा, पंतप्रधान मोदींचा जुना व्हिडिओ व्हायरल

बुलेट ट्रेन केवळ दिखावा, पंतप्रधान मोदींचा जुना व्हिडिओ व्हायरल

मुंबई -मुंबई बुलेट ट्रेनला मनसे आणि शिवसेनेने कडाडून विरोध केलेला आहे. त्यातच बुलेट ट्रेन केवळ दिखावा आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. बुलेट ट्रेनमध्ये कोणीच बसणार नाही. केवळ जगाला दाखवण्यासाठी बुलेट ट्रेन सुरू करा, असे आपण तत्कालिन पंतप्रधानांना सांगितल्याचे धक्कादायक विधान मोदी यांनी केले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  

ज्यावेळी मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यावेळचं हे विधान आहे. मुंबईत 2013 मध्ये इंडियन मर्चंट चेंबरच्या एका कार्यक्रमात मोदींनी हे विधान केलं होतं. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकांऊटवरुन मोदींचा हा जुना व्हिडिओ अपलोड करुन फक्त दिखाव्यासाठी बुलेट ट्रेनचा घाट घातला जात असल्याचा आरोप केला आहे.

COMMENTS