भारिप-बमसंचा आज कार्यकर्ता मेळावा, कारंजा पॅटर्न आता रिसोड तालुक्यात  !

भारिप-बमसंचा आज कार्यकर्ता मेळावा, कारंजा पॅटर्न आता रिसोड तालुक्यात  !

वाशिम – रिसोड तालुका भारिप बमसं कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा स्थानिक पंचायत समिती सभागृहात  आज होणार आहे. जिल्हा अध्यक्ष हाजी मोहम्मद युसूफ पुंजानी मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. केशवराव सभादिंडे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या मेळाव्याला जिल्हा निरीक्षक प्रा एस बी खंडारे,जिल्हा महासचिव प्रा रामदास कळासरे,प्रमुख मार्गदर्शक प्रा रविभाऊ अंभोरे,जेष्ठ नेते डॉ रवि मोरे पाटील,जिल्हा उपाध्यक्ष गिरीधर शेजुळ,जिल्हा सचिव डॉ गजानन हुले, ता महासचिव विजय शिरसाठ, ता.संघटक विश्वनाथ पारडे, युवा ता.अध्यक्ष सिद्धार्थ जमधाडे, ता.सचिव योगेश बकाल .मा अध्यक्ष दिलीप नवघरे,युवा नेतृत्व प्रदीप खंदारे, निंबाजी सभाडींडे,शेख मुनाफ,इत्यादि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. युसूफ पुंजानी जिल्हा अध्यक्ष झाल्यापासून भारिप ने जबरदस्त मुसंडी मारीत कारंजा,मंगरुळपिर,मानोरा नगर परिषदेवर  भारिप चा झेंडा फडकविला आता रिसोड नगर परिषद वर लक्ष केंद्रीत करून कारंजा पॅटर्न अमलात आणून भारिप-बमसं सत्ता मिळविण्याच्या प्रयत्नात आहे

पंचायत समिती ,जिल्हा परिषद निवडणुकीची जोरदार तयारी करण्यासाठीही या बैठकीत विचारविनिमय होणार आहे. या मेळाव्यात भारिप मध्ये शहरासह तालुक्यातील अनेक तरुण प्रवेश करणार आहेत शहरातील युवा नेतृत्व प्रदीप वसंतराव खंडारे सह त्यांच्या शेकडो युवकांचा प्रवेश पक्षात होणार आहे.मेळाव्याला जास्तीत  जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका अध्यक्ष केशवराव सभादिंडे  यानी केले आहे

COMMENTS