मंदिरातील पुजारी आणि कर्मचा-यांना मिळणार सरकारी पगार !

मंदिरातील पुजारी आणि कर्मचा-यांना मिळणार सरकारी पगार !

हैदराबाद – तेलंगाणामध्ये मंदिराचे पुजारी आणि मंदिरातील कर्मचारी यांना सरकारी पगार मिळणार आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी ही घोषणा केली आहे. येत्या नोव्हेंबरपासून सरकारी तिजोरीतून त्यांना पगार मिळणार आहे. राज्यातील पुजारी आणि कर्मचारी आज मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांना भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे. तेलंगणामध्ये याचा फायदा 5625 पुजारी आणि कर्मचा-यांना होणार आहे. पुजारी आणि मंदिरातील कर्मचा-यांची अत्यंत बिकट आर्थिक स्थिती आहे. या निर्णयामुळे त्यांना फायदा होईल अशी आशाही चंद्रशेखर राव यांनी व्यक्त केली आहे. आता इतर धर्मियांकडूनही अशा प्रकारची मागणी होण्याची शक्यता आहे.

COMMENTS