मतदानयंत्रे नकोच, मतपत्रिकेद्वारे मतदान घ्या, 16 पक्षांची मागणी

मतदानयंत्रे नकोच, मतपत्रिकेद्वारे मतदान घ्या, 16 पक्षांची मागणी

दिल्ली – मतदान यंत्राच्या विश्वासहार्यतेवर संशय अजूनही कायम आहे. काल 16 पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार केली आहे. यापुढच्या निवडणुका या मतदान यंत्रामार्फत घेऊ नये, मतपत्रिकेच्या माध्यमातूनच घ्याव्यात अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 16 पक्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, डावे पक्ष यासह विविध पक्षांचा समावेश होता. यापूर्वीही आम आदमी पार्टी, बहुजन समाज पार्टी या पक्षांनीही ईव्हीएमवर आक्षेप घेतला आहे. मध्यप्रदेशात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीपूर्वी ईव्हीएमची चाचणी घेण्यात आली होती. त्यावेळी कोणतेही बटण दाबले तरी मतदान भाजपला होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर तिथल्या दोन मोठ्या अधिका-यांच्या बदल्या झाल्या होत्या. यावरुन विरोधी पक्षांच्या आरोपाला बळ मिळत आहे. निवडणूक आयोगाने आता या तक्रारीची दखल घेत सर्वपक्षीय बैठक बोलवण्याचं ठरवलं आहे.

COMMENTS