मध्यावधी निवडणुकीस भाजप तयार – मुख्यमंत्री

मध्यावधी निवडणुकीस भाजप तयार – मुख्यमंत्री

राज्यात मध्यावधी निवडणुकीस भाजप तयार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. पीटीआय या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलंय. राज्यातली शेतकरी आंदलोन, शिवसेनेचे भाजपवर दररोजची टीका त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुकीची चर्चा आहे. यावर बोलतना भाजप मध्यावधी निवडणुकीसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शेतक-यांचं आंदोलन सुरू होतं, तेंव्हा सरकारचा पाठिंबा काढण्याची धमकी शिवसेना देत होते, पण मला त्यांना सांगायचं आम्ही त्यासाठी तयार आहोत. एखाद्यानं राज्यावर मध्यावधी निवडणुका लादल्याच तर आम्ही त्यासाठी सज्य आहोत. आणि निवडणुकीनंतर पुन्हा भाजप राज्यात सत्ता स्थापन करेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केलाय. गेल्या काही दिवसात राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपला चांगलं यश मिळालं होतं. त्यामुळे विधानसभेची निवडणुक लागली तरी भाजप पुन्हा मुसंडी मारेल यावर मुख्यमंत्र्यांना विश्वास आहे.

COMMENTS