मराठवाड्यात गेल्या 8 दिवसात 34 शेतकऱ्यांच्या आत्महत्या !

मराठवाड्यात गेल्या 8 दिवसात 34 शेतकऱ्यांच्या आत्महत्या !

बीडमध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या

मराठवाड्यातील दुष्काळ, नापिकी, गारपीट आणि डोक्‍यावरील वाढत जाणाऱ्या कर्जाच्या डोंगरामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये प्रमाणात वाढ होत आहे.  गेल्या 8 दिवसात मराठवाड्यात तब्बल 34 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलंय. म्हणजे प्रत्येक दिवशी 4 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवलं आहे.

1 जानेवारी ते 13 ऑगस्ट  2017 दरम्यान मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात तब्बल 580 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहे. यामध्ये आर्थिक मदतीसाठी प्रशासकीय स्तरावर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे 400 प्रकरणे पात्र ठरली आहे तर 80 प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली आहे. आत्महत्याचे सर्वाधिक प्रमाण बीड जिल्हात असून 115 शेतक-यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलंय.

COMMENTS