मालेगावमध्ये काँग्रेस शिवसेनेचे गळ्यात गळे, महापौर काँग्रेसचा, शिवसेनेचा उपमहापौर

मालेगावमध्ये काँग्रेस शिवसेनेचे गळ्यात गळे, महापौर काँग्रेसचा, शिवसेनेचा उपमहापौर

मालेगाव – मालेगाव महापौरपदाच्या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे सत्तेसाठी दोन पक्षांना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष झाला आहे. तर त्याच्याखालोखाल राष्ट्रवादीला जागा मिळाल्या आहेत. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा मालेगावात छत्तीसचा आकडा आहे. त्यामुळे राज्यपातळीवर एकमेकांचे कट्टर वैरी असलेले काँग्रेस आणि शिवसेना सत्तेसाठी एकत्र आले आहेत. त्यानुसार काँग्रेसचा महापौर तर उपमहापौरपद शिवसेनेला देण्यात आलं आहे. महापौरपदासाठी कांग्रेसतर्फे महापौरपदा साठी रशीद शेख तर उपमहापौर पदा साठी शिवसेनेचे सखाराम घोड़के यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. विकासाच्या मुद्द्यावर  काँग्रेसला पाठिंबा दिल्याचे शिवसेनेचे म्हणणे. महापालिका इतिहासात प्रथमच शिवसेनचा उपमहापौर होणार. 14 जून रोजी  निवडणूक होणार.

COMMENTS