मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दुधाचा अभिषेक !

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दुधाचा अभिषेक !

यवतमाळ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दुधाचा अभिषेक घालण्यात आला. पालकमंत्री मदन येरावार यांचे घरापुढे शेतक-यांनी आंदोलन केले. पालकमंत्री येरावार यांच्या घरापुढं शेतकऱ्यांनी भाजीपाला फेकला व दुध ओतून संताप व्यक्त केला. यावेळी पालकमंत्र्यांवर कांदे फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला तेव्हा शेतकरी नेते व पालकमंत्र्यांमध्ये बाचाबाची झाली.

दोन दिवसांपासून राज्यभरात सुरू असलेला संप शेतकऱ्यांनी मागे घेण्याची घोषणा केली, मात्र  संप मागे घेण्याची घोषणा होऊनही पुणतांबा आणि नाशिक येथील शेतकऱ्यांनी सरकारविरोधी संघर्षाचा पवित्रा कायम ठेवला आहे. ठिकठीकाणी आंदोलन आज सुरू आहेत.

कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडून पुकारण्यात आलेल्या संपाची सर्व सूत्रे पुणतांब्यातून हलवण्यात येत होती. मात्र, सरकारशी समझोता केल्यानंतर या कोअर कमिटीच्या शेतकऱ्यांमध्येच वाद निर्माण झाले आहेत. त्यामुळे आता नाराज शेतकऱ्यांच्या गटाने पुणताब्यांत कोअर कमिटीच्या निर्णयाविरोधात आंदोलन सुरू केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी शेतकरी सदस्यांना गुंडाळलं, सदस्यांची दिशाभूल केली आहे. संपूर्ण कर्जमाफीची मागणी मान्य केलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारे आहे. संपूर्ण कर्जमाफी आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू होत नाही, तोवर संप मागे घेणार नाही अशी भूमिका घेत नाराजांच्या गटाने संपाचा पवित्रा कायम ठेवला आहे.

 

COMMENTS