राज्यात दुस-या टप्प्यातील ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

राज्यात दुस-या टप्प्यातील ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

मुंबई : राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील 18 जिल्ह्यातील 3 हजार 692 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. यात प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील जिल्ह्यांमध्ये ही निवडणूक प्रक्रिया होणार आहे.

यामध्ये ठाणे- 14, पालघर- 56, रायगड- 242, रत्नागिरी- 222, सिंधुदुर्ग-325, पुणे- 221, सोलापूर-192, सातारा- 319, सांगली-453, कोल्हापूर- 478, नागपूर-238, वर्धा- 112, चंद्रपूर- 52,भंडारा- 362, गोंदिया- 353 आणि गडचिरोली- 26 अशा एकूण 3692 ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे.

संवेदनशील मतदान केंद्रांवर मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते 3.30 वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहेत. इतर ठिकाणी संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदानाची होणार आहे. तर 17 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

 

 

COMMENTS