राज्यातील 7 हजार 576 ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर, सरपंचाची होणार थेट निवडणूक !

राज्यातील 7 हजार 576 ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर, सरपंचाची होणार थेट निवडणूक !

मुंबई – राज्यातल्या 7 हजार 576 ग्रामपंचायत निवडणूकाचा कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केला. त्यानुसार ऑक्टोबरमध्ये दोन टप्प्यात या निवडणूका होणार आहेत.

पहिल्या टप्यात नाशिक,  औरंगाबाद, आणि अमरावती या तीन महसूल विभागात 3, 884 ग्रामपंचायत निवडणुका होणार. ही निवडणूकीचे मतदान 7  ऑक्टबरला होणार असून मतमोजणी 9 ऑक्टोबरला होणार आहे.  दुसऱ्या टप्प्यात कोकण – पुणे – नागपूर महसूल विभागातील 3,692 ग्रामपंचायतच्या निवडणूका होणार. यामध्ये 14 ऑक्टोबरला मतदान आणि 16 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीचे वैशिष्य म्हणजे सरपंचपदाची थेट निवडणूक होणार आहे. जिल्हानिहाय यादी खालील प्रेस नोटमध्ये दिली आहे.

 

COMMENTS