शिवसेनेच्या खासदारांनी लोकसभेत साजरा केला शिवजयंती सोहळा

शिवसेनेच्या खासदारांनी लोकसभेत साजरा केला शिवजयंती सोहळा

लोकसभेत छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करुन, मिठाई वाटुन शिवसेनेने आज शिवजयंती साजरी केली. शिवसेनेच्या सर्व खासदारांच्या वतीने खासदार अरविंद सावंत यांनी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. सदर सोहळ्यास खासदार अनील देसाई, संजय राऊत, श्रीरंग बारणे, शिवाजीराव अढळराव पाटील, संजय जाधव, रविंद्र गायकवाड, कृपाल तुमाने हे शिवसेनेचे खासदार तसेच लोकसभेचे संयुक्त सचिव योगेश देशमुख उपस्थित होते.

COMMENTS