शिवसेनेत खांदेपालट, दिवाकर रावते आऊट, अनिल परब इन ?

शिवसेनेत खांदेपालट, दिवाकर रावते आऊट, अनिल परब इन ?

मुंबई – विधान परिषदेतील शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांना पहिला धक्का शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना विधान परिषदेतील गटनेतेपदावरुन हटवण्यात येणार आहे. त्यांच्या जागी अनिल परब यांची वर्णी लागणार आहे. सूत्रांनी ही माहिती दिलीय. मुंबई महापालिका निवडणुकीत केलेल्या कामगिरीबद्दल परब यांना ही बक्षीसी मिळाल्याचं बोलंल जातंय. रावते यांच्याकडून गटनेतेपद काढून घेतल्यामुळे त्यांचे मंत्रीपद कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान शिवसनेच्या आमदारांची बैठक आज होणार आहे. या बैठकीत हा निर्णय घोषित केला जाण्याची शक्यता आहे. तसेच काही ज्येष्ठ मंत्र्यांना नारळ देऊन त्यांच्या जागी विधानसभेतील आमदारांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर काही राज्यमंत्र्यांना बढतीही मिळण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ मंत्र्यांविरोधात शिवसेनच्या आमदारांमध्ये नाराजी असल्याने हा निर्णय घेतला जाणार आहे.

COMMENTS