शिवीगाळ करत भाजपच्या मंत्र्याची शिवार संवाद यात्रा सुरू !

शिवीगाळ करत भाजपच्या मंत्र्याची शिवार संवाद यात्रा सुरू !

हिंगोली – सामाजिक न्यायमंत्री दिपील कांबळे यांची जीभ पुन्हा एकदा घसरली. जिल्ह्याच्या दौ-यात मंत्र्यांच्याविरोधात बातमी लिहील्यामुळे थेट ते पत्रकारांवर घसरले. पत्रकारांना जोड्याने मारायला पाहिजे, अशा शब्दात त्यांनी पत्रकारांचा उद्धार केला. पत्रकार पाकीट घेऊन काहीही छापतात, बांडगुळ पत्रकार खूप आगाऊ आहेत अशी मुक्ताफळं मंत्री कांबळे यांनी उधळळी. मी कुणाला घाबरत नाही ज्यांना जे छापायाच, लिहायचं ते लिहा अस ही म्हटलंय. सिंहाला मी सिंह आहे अशी सांगण्याची कागदी गरज नसते असा ही शब्द प्रयोग स्वतःवर स्तुती सुमने ही उधळली. दिलीप कांबळे शिवार सवांद निमित्त हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आले होते. हिंगोली जिल्ह्यातील माळ हिवरा येथे शनिवारी ते शेतकऱ्यांशी बोलत होते. स्थानिक वर्तमान पत्रात त्यांच्या शिवार सवांद यात्रेच्या निगेटिव्ह बातम्या छापून आलेल्या होत्या,त्या बातम्यामूळे दिलीप कांबळे पत्रकारांवर घसरले, दिलीप कांबळे आपल्या बेताल वक्तव्यामुळे नेहमीच अडचणीत येत असतात, पुन्हा एकदा ते त्यांच्या बेताल वक्तव्यामुळ प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत..

COMMENTS