Live Updete : शेतक-यांच्या ऐतिहासिक संपाला आजपासून सुरूवात, आंदोलनाला हिंसक वळण

Live Updete : शेतक-यांच्या ऐतिहासिक संपाला आजपासून सुरूवात, आंदोलनाला हिंसक वळण

भाजीपाला,दूध रस्त्यावर 

कर्जमाफी, हमीभाव आणि इतर मागणीसाठी शेतक-यांनी आजपासून संप पुकारला आहे. इतिहासात पहिल्यांदाच शेतकरी संपावर जाण्याची ही घटना आहे. संपावर जाणा-या शेतक-यांनी काही ठिकाणी आक्रमक रूप घेतलं असून काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण आल्याचं समोर आलं आहे.

शेतक-यांच्या संपाचा मुंबई, पुणे आदी प्रमुख शहारांतील दूध व भाजीपाल्याच्या पुरवठ्यावर विपरीत परिणाम होणार असून शुक्रवारपासून दूध, भाजीपाल्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारशी मंगळवारी झालेली अंतिम टप्प्यातील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर शेतक-यांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतल आहे.

पश्चिम महाराष्ट्रात शेतक-यांच्या संपानं उग्र रूप धारण केलं आहे. काही ठिकाणी तोडफोडीच्या घटना घडल्याचंही समोर आलं आहे. साताऱ्यात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूरहून मुंबईकडे येणाऱ्या दुधाच्या गाड्या रोखल्या. दूध घेऊन जाणा-या दोन ट्रकच्या काचा फोडल्या आहे. मध्यरात्री पुणे-बंगळुरू महामार्गावर ही तोडफोड करण्यात आली आहे.  अहमदनगरमध्येही शेतकरी संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून. आवक घटल्याने भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात निघोज येथे दुधाचा टॅंकर अडवून अख्खे दूध रस्त्यावर सोडून दिले.

शेतक-यांच्या संपाचा काही प्रमाणात परिणाम सर्वसामान्यांवर पडताना दिसून येत आहे. जर तोडगा निघाला नाही तर सर्वसामान्यांना त्याचा मोठा त्रास होऊ शकतो. आज प्रामुख्याने नगर, नाशिक जिल्ह्य़ांतील दूधसंकलन बंद राहणार असून बाजार समित्यांचे कामकाजही बंद ठेवण्यात आले आहे. बाजारात दूध व भाजीपाला आणू नये असे आवाहन संपकऱ्यांनी केले असून त्याला शेतक-यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

Live Updete

# शेतकरी संपाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा, संप मिटेपर्यंत स्वाभिमानीचा दूध संघ बंद – खासदार राजू शेट्टी.

# नांदेडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दूध व भाजीपाल्याचा अभिषेक घातला.

# गडचिरोलत शेतकरी संपाचा परिणाम नाही. कुठेही आंदोलन नाही. गडचिरोलीसह जिल्हाभरातील भाजी मार्केट सुरू. शेतकऱ्यांच्या संपासाठी पुढाकार घेणाऱ्या नेतृत्वाचा अभाव.

# आजपासून राज्यातला शेतकरी संपावर साताऱ्यात शेतकरी संपाची पहिली ठिणगी

# आठवडी बाजार न उघडण्याचं आंदोलनकर्त्यांचं आवाहन

# पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर दूध वाहतूक करणारे वारणा डेअरीचे २ ट्रक फोडले

# नगर जिल्ह्यातील 3500 दूध संकलन केंद्र बंद 500 शीतकरण केंद्र आणि प्रकल्प बंद राहणार

# शिर्डी बस स्थानकाजवळ पहाटे दुधाचे 2 टँकर अडवले

# श्रीरामपूरमध्ये केळी घेऊन जाणारा ट्रक फोडला, फळ व्यापाऱ्यांकडून आंदोलकांना धक्काबुक्की

# नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक, 19 बाजार समित्या बंद, शेतकरी रस्त्यावर

 

 

COMMENTS