सरपंच निवडीच्या भाजपच्या आकडेवारीत पहा कशी आहे गफलत, सोशल मीडियावर उडवली जातेय खिल्ली !

सरपंच निवडीच्या भाजपच्या आकडेवारीत पहा कशी आहे गफलत, सोशल मीडियावर उडवली जातेय खिल्ली !

मुंबई – राज्यातल्या सुमारे साडेतीन हजार ग्रामपंयाचयतीची 7 ऑक्टोबरला निवडणूक झाली. त्याचे निकाल 9 ऑक्टोबरला लागले. या निवडणुकीत संरपचाची थेट निवडणूक झाली. सरपंचची निवडणूक किंवा सदस्यांची निवडणुक ही कोणत्याही पक्षाच्या नावावर किंवा चिन्हावर लढवल्या गेल्या नाहीत. त्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षाने आमच्या पक्षाचे एवढे सरपंच निवडूण आले असं दावे करणे हास्यास्पद आहे. ग्रामपंयाततीमध्ये विविध आघाड्या असतात आणि विविध पक्षाच्या कार्यकर्ते एकत्र आलेले बहुतेक ठिकाणी चित्र असंत.

असं असतानाही भाजपनं मात्र सोशल मीडियातून थेट सरपंच निवडीचा भाजपला जबरदस्त फायदा झाला आणि भाजपचे सर्वाधिक सरपंच निवडूण आल्याच्या बातम्या सोडल्या. त्याला काही इतर माध्यमांनीही साथ दिली. एवढच नाही तर मुख्यमंत्र्यांनी मुंबईत आकडेवारी दिली आणि तशी मुलाखतही माध्यमांना दिली.  तिकडे दिल्लीत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही सरपंचपदाची निवडणूक झाली आणि भाजपला मोठे यश मिळाले हे सांगण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. त्यातही त्यांनी आकडे दिले. भाजपने पक्षातर्फे अधिकृत पत्रकही जारी करण्यात आलं. त्यामध्ये जिल्हानिहाय सरपंचाची यादी दिली.

निवडणूक ही पक्षविरहीत असल्यामुळे दावे करता येतच नाहीत, परंतु तरीही आपण ते गृहीत धरू. मात्र त्यांनी दिलेल्या आकडेवारीतही गफलत होती. भाजपने दिलेल्या आकडीवारीनुसार औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 212 ठिकाणी सरपंच पदाची निवडणूक झाली. मात्र त्यांच्याच आकडेवारीनुसार औरंगाबाद जिल्ह्यात जिंकलेल्या सर्वपक्षीय सरपंचांची बेरीज ही 228 होत आहे. मग जर एकूण जागा 212 असतील तर जिंकलेल्या जागा 228 कशा ? 9  तारखेला भाजप नेत्यांनी काढलेलं पत्रक काही नेत्यांनी ट्विट केलं होतं. ती आकडेवारी तुम्हीच पडताळून पहा….

औरंगाबादच्या आकडेवारीवरीवरुन सोशल मीडियातून भाजपवर टीका झाली. त्यांची खिल्ली उडवण्यात आली. त्यामुळे आज (10 ऑक्टोबरला ) पुन्हा नवं पत्रक काढलं आणि ते त्याच नेत्यांनी ट्विट केलं आहे. त्यामध्ये औरंगाबादमधील एकूण सरपंचपदे 228 दाखवण्यात आली आहेत. 10 ऑक्टोबरला दुरूस्तीचं हे पत्र खाली देत आहोत. ते निरखून पहा…..

औरंगाबादमधील आकडेवारीवरुन खिल्ली उडवली गेल्यामुळे त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली. मात्र नंदुरबारमधील आकडीवारीमध्ये असलेली गफलत तशीच राहिली आहे. नंदुरबारमध्ये एकूण 51 जागा दाखवल्या आहेत. मात्र निवडणू आलेले सरपंच मात्र 54 दाखवण्यात आले आहेत. आता भाजपने केलेले दावे लोकांना किती पटतात हा वादाचा मुद्दा असू शकतो. मात्र आकडेवारीमधील गफलतीमूळे पक्षाचं सोशल मीडियावर चांगलंच हसं होतंय.

COMMENTS