सिध्दीविनायक मंदिरात ऑफलाईन बुकिंग बंद – आदेश बांदेकर

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग करावं लागणार आहे. यासाठी तुम्हाला सिद्धिविनायक गणपती टेमल असा ॲप डाऊनलोड करायचा आहे. या ॲप माध्यमातून भाविकांनी नोंद केल्यावरच प्रवेश दिला जाईल. तसेच ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी भाविकांनी दर्शन घेता येणार आहे, असं पत्रकार परिषदेमध्ये सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सांगितले.

आदेश बांदेकर म्हणाले की, ‘मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी अत्यंत अध्ययावत असं संगणक प्रणालाची उपयोग करून एक यंत्रणा तयार केलेली आहे. प्रत्येक भाविकाला सिद्धिविनायक गणपती टेम्पल असा ॲप डाऊनलोड करायचा आहे. ॲप डाऊनलोड केल्यानंतर यामध्ये दिलेल्या सर्व गोष्टी नोंद केल्यावर ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी भाविकांना दर्शन घेता येणार आहे. तसेच नोंद झाल्यावर क्यूआर कोट देखील दिला जाईल.’

पुढे आदेश बांदेकर म्हणाले की, ‘मार्गदर्शक सूचना नुसार भाविकांची तपासणी केली जाणार आहे. प्रत्येक भाविकांचं सहकार्य यामध्ये अपेक्षित आहे. भाविकांनी जास्त गर्दी करू नये. पहिल्यांच दिवशी दिवसभरात ज्या भाविकांनी क्युआर कोट जनरेट केला आहे, अशा १ हजार भाविकांना दर्शन दिलं जाणार आहे. प्रतितास १०० भाविक यामध्ये दुपारची नैवेद्य आणि पूजेची वेळ आणि संध्याकाळची धुपाआरती आणि आरती वेळ या व्यतिरिक्त सकाळी ७ वाजल्यापासून तुम्ही एक-एक तासाच्या सॉल्टमध्ये दर्शनाची वेळ नोंद करू शकता. क्युआर कोटच्या साहाय्याने तुम्ही मंदिरात प्रवेश करू शकता. ‘

COMMENTS