स्वामीनाथन यांच्या नावाला शिवसेनेनंतर राष्ट्रवादीचाही पाठिंबा ?

स्वामीनाथन यांच्या नावाला शिवसेनेनंतर राष्ट्रवादीचाही पाठिंबा ?

दिल्ली – राष्ट्रीय स्वसंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचं नाव राष्ट्रपतीपादसाठी भाजपला नको असल्यास हरीत क्रांतींचे प्रणेते एम एस स्वामीनाथन यांच्या यांचं नाव शिवसेनेनं राष्ट्रपतीपदासाठी सुचवलं आहे. स्मामीनाथन यांचे नाव भाजपने पुढे केल्यास त्याला सर्वांकडून पाठिंबा मिळू शकतो असं वक्तव्य राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस डी पी त्रिपाठी यांनी केलंय. त्यामुळे राष्ट्रवादीचा स्वामीनाथन यांच्या नावाला पाठिंबा असल्याचे संकेत दिले आहेत. शरद पवार यांचे स्वामीनाथन यांच्याशी घनीष्ठ संबंध आहेत. त्यामुळे पवारांच्या सुचनेवरुनच त्रिपाठी बोलले असावेत असाही कयास राजकीय वर्तुळात लावला जात आहे. दरम्यान आज मुंबईत रामदास आठवले यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. आणि राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार यांचं नाव निश्चित झाल्यास आपल्याला आनंदच होईल असंही आठवले यांनी सांगितलं.

COMMENTS