अन् नगरसेवकाने महापालिकेत आणले चक्क डुक्कर!

अन् नगरसेवकाने महापालिकेत आणले चक्क डुक्कर!

अकोला महापालिकेत नगरसेवकांनी चक्क डुकराचे पिल्लू आणलं होत. कारण देखील तसचं होतं. भाजप नगरसेवक अजय शर्मा यांनी अस्वच्छतेच्या मुद्द्यावर लक्ष वेधण्यासाठी  आज (दि.28) सभागृहात डुकराचे पिल्लू आणलं. यावेळी कचऱ्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी गोंधळ घातला. आयुक्त अजय लहाने यांच्याशी नगरसेवकांची जोरदार  खडाजंगी झाली. महापौर आणि भाजप नगरसेवकांमध्ये तू तू-मै मै झाली. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते साजिदखान पठाण यांनी टेबल उलटून सभागृहात गोंधळ घातला.

अकोला महापालिकेची आज सर्वसाधारण सभा होत आहे. करवाढीच्या मुद्द्यावर भारिप – बहुजन महासंघ भाजपच्या सत्ताधाऱ्यांना घेराव घालण्याच्या रणनितीत आहेत. यासाठी भारिपकडून महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे.

COMMENTS