अन् मोदींनी त्यांना बुट काढण्यापासून रोखले

अन् मोदींनी त्यांना बुट काढण्यापासून रोखले

उत्तरांचल – पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंड दौ-यासाठी गेले असता तेथील उपस्थित कर्मचारी त्यांच्या पायातील बुट काढण्यासाठी पुढे सरसावला. मात्र यावेळी मोदींनी इतर नेत्यांप्रमाणे पाय पुढे करत बुट काढून न घेता त्याला थांबवलं आणि स्वत:च बुट काढला. मोदींच्या या वागण्याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. विशेष म्हणजे मोदींच्या उत्तराखंड दौ-यातील या घटनेची सर्वात जास्त चर्चा केली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिरात दर्शनासाठी आले होते. त्यावेळीस ही घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी उत्तराखंड दौ-यावर होते. यावेळी त्यांनी केदारनाथचं दर्शन घेतलं. विशेष म्हणजे मोदी देशातील पहिले पंतप्रधान आहेत, ज्यांच्या दर्शनानंतर केदारनाथचं दर्शन सर्वसामान्य भाविकांसाठी खुलं झालं. मोदींनी केदारनाथच्या मंदिरात पोहोचून रुद्राभिषेक केला. महाप्रलयाच्या तीन वर्षानंतर पहिल्यांदाच केदारनाथमध्ये इतका जंगी सोहळा झाला.

COMMENTS