अमित शाह, मुख्यमंत्री, दानवे मातोश्रीवर दाखल

अमित शाह, मुख्यमंत्री, दानवे मातोश्रीवर दाखल

मुंबई – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले आहेत. राष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेनं भाजपनं सुचवलेल्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा अशी मागणी करण्यासाठी अमित शाह हे मातोश्रीवर दाखल झाले आहेत. त्याचबरोबर भाजप आणि शिवसेना यांच्यात ताणलेल्या संबधावरही उभय नेत्यांमध्ये बोलणं होण्याची शक्यता आहे. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कसा प्रतिसाद देतात ते थोड्याच वेळात समजेल.

COMMENTS