आठवीपर्यंतची ढकलगाडी बंद होणार!

आठवीपर्यंतची ढकलगाडी बंद होणार!

आता आठवीपर्यंतची ढकलगाडी बंद होणार आहे. आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास न करण्याचे धोरण आता संपुष्टात येणार आहे. केंद्र सरकारने  या निर्णयाला कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीत मंजुरी दिली आहे. परंतु, या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये या करीता पुढील वर्गात प्रवेश मिळण्याची आणखी एक संधी दिली जाईल. हे विधेयक मंजुरीसाठी संसदेत सादर केले जाणार आहे. शिक्षण अधिकार अधिनियमांतर्गत केलेल्या तरतुदीनुसार विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण न होता ही आठवीपर्यंत जाऊ शकतो. हा नियम एप्रिल 2011 मध्ये लागू करण्यात आला होता. आता ‘राइट टू एज्युकेशन’ विधेयकात काही बदल केले जातील. संसदेत सादर केल्या जाणाऱ्या या प्रस्तावित विधेयकात राज्यांना मार्च महिन्यात आठवीपर्यंतच्या परीक्षा घेण्याचा अधिकारी देण्यात येईल.

आता अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मे महिन्यात होणाऱ्या परीक्षेत सहभागी होण्याची अखेरची संधी दिली जाईल. जर या दोन्ही परीक्षांमध्ये विद्यार्थी अयशस्वी ठरला तर त्यांना त्याच वर्गात ठेवण्यात येईल.  सध्याच्या नियमाप्रमाणे आठवीपर्यंतच्या कोणत्याच विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण करता येत नाही. विद्यार्थ्यांवरील मानसिक दबाव दूर करून त्यांना प्राथमिक शिक्षण मिळावे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला होता.

 

 

COMMENTS