आदित्य ठाकरे यांनी घेतली जस्टिन बिबरची भेट, दोन तास रंगली चर्चा

आदित्य ठाकरे यांनी घेतली जस्टिन बिबरची भेट, दोन तास रंगली चर्चा

जस्टिन बिबरची म्युझिक कॉन्सर्ट बुधवारी नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर पार पडली. सिनेसृष्टीसह सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सध्या भारताच्या दौऱ्यावर असलेल्या जस्टिन बीबरची नवी मुंबईत भेट घेतली. हॉटेलमध्ये झालेल्या भेटीत जस्टिन बीबर आणि आदित्य ठाकरे यांच्यात दोन तास चर्चा झाल्याचे समजते. आदित्य ठाकरेंवरही जस्टिन बिबर यांचं फिव्हर असल्याचं यामुळे स्पष्ट झालं.

दरम्यान जगप्रसिद्ध पॉपस्टार मायकेल जॅक्सनही काही वर्षांपूर्वी भारतात आला होता. त्याला भेटण्यासाठी त्यावेळीही त्याच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. तसेच, विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळींनी त्याची भेट घेतली. मात्र, या सर्वात जोरदार चर्चा झाली ती राज ठाकरे आणि मायकेल जॅक्सन यांच्या भेटीची. या भेटी प्रमाणेच आदित्य ठाकरे आणि जस्टिन बीबरच्या भेटीची चर्चा होत आहे.

जस्टिन बीबरचा कार्यक्रम नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर पार पडला. या कार्यक्रमास त्याची चाहती असलेल्या तरूणाईने तुफान गर्दी केली. पॉपस्टार असलेल्या जस्टिनाच भारतातील हा पहिलाच कार्यक्रम आहे. जस्टिनच्या कार्यक्रमात प्रवेश मिळण्यासाठी तब्बल ५ हजारांपासून ते १५ हजारांपर्यंत तिकीट दर ठेवण्यात आला होता.

COMMENTS