आधी उमेदवार सांगा, मग पाठिंब्याचं सांगू , शिवसेनेची भूमिका – सूत्र

आधी उमेदवार सांगा, मग पाठिंब्याचं सांगू , शिवसेनेची भूमिका – सूत्र

मुंबई – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत शाह यांनी राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या उमेदवाराला शिवसेनेनं पाठिंबा द्यावा अशी मागणी केली. मात्र शिवसेनेनं ती धुडावून लावल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. आधी उमेदवार जाहीर करा, मग आम्ही पाठिंब्याबाबत निर्णय घेऊ असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचं कळतंय.  एनडीएतील घटकपक्षांनी एनडीएचा उमेदवार ठरवण्याचे सर्वाधिकार दिले आहेत. त्याच धर्तीवर शिवसेनेनंही करावे अशी शाह यांची अपेक्षा होती. मात्र शिवसेना तसं करण्यास राजी नसल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे मातोश्री वारी करुनही अमित शाहंच्या पदरात फारसं काही पडलं नसल्याचं दिसून येतंय. शिवसेनेनं सरसंघचालक मोहन भागवत किंवा भाजपला ते नको असल्यास हरित क्रांतीचे प्रणेते एम एस स्वामीनाथन यांची नावे सुचवली आहेत.

COMMENTS