आमदाराला लाच देणारा झेडपीचा बडा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात, रिव्हर्स ट्रॅपने खळबळ !

आमदाराला लाच देणारा झेडपीचा बडा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात, रिव्हर्स ट्रॅपने खळबळ !

धुळे – पंचायत राज कमिटीचे सदस्य असलेले नांदेडचे शिवसेनचे आमदार हेमंत पाटील हे आज धुळे जिल्ह्याच्या दौ-यावर होते. धुळे जिल्हा परिषदेतील कामकाजाचे ते पाहणी करणयासाठी आले होते. त्यावेळी धुळे जिल्हा परिषदेचे उप मुख्यकार्यकारी अधिकीरी तुषार माळी यांनी त्यांना चांगला अहवाल देण्यासाठी अडीच लाख रुपयांची लाच देऊ केली. हेमंत पाटील यांनी याची तक्रार धुळे एसीबीकडे केली. त्यानंतर सापळा रचुन आमदार हेमंत पाटील यांना अडीच लाख रुपयांची लाच देताना तुषार माळी यांना रंगेहात अटक करण्यात आली. या रिव्हर्स ट्रॅपने एकच खळबळ उडाली आहे.

COMMENTS