आरएसएसमुक्त भारताची हाक देणारे नितीशकुमार आरएसएसप्रमुखांना भेटणार !

आरएसएसमुक्त भारताची हाक देणारे नितीशकुमार आरएसएसप्रमुखांना भेटणार !

पाटणा – राजकीय नेते किती कोलांटउड्या मारताते ते आपण नेहमीच पाहतो. एका राजकीय विचासरणीतून दुस-या राजकीय विचारणीत ते कधी उडी मारतात ते कळतही नाही. अगदी बिनदिक्तपणे ते त्याचं समर्थनही करतात. असंच आणखी एक उदाहरण आपल्याला पहायला मिळतंय. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा गेली विधानसभा निवडणूक लागेपर्यंत हिंदुत्ववादी भाजपसोबत सुखाने संसार सुरू होता. विधानसभा निवडणूकीत दीड वर्षापूर्वी त्यांनी भाजपसोबत काडीमोड घेतला आणि धर्मनिरपेक्ष काँग्रेस आणि लालूप्रसाद यांच्यासोबत घरोबा मांडला. त्यावेळी प्रचारत त्यांनी अगदी आरएसएसमुक्त भारताची हाक दिली होती. दीड वर्षानंतर लगचे त्यांनी पुन्हा लालू आणि काँग्रेस यांच्यासोबत काडीमोड घेतली आणि पहिल्या मित्रासोबत घरोबा केला. आता  तरे सरसंघचालक मोहन भागवत यांचीही भेट घेणार आहेत. उद्या बिहारमधील भोजपूरमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित राहणार आहेत. यावेळी नितीश कुमार त्यांची भेट घेतील. भोजपूरमधील कार्यक्रम धार्मिक आणि सांस्कृतिक स्वरुपाचा असेल. त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही, असे संयुक्त जनता दलाचे प्रवक्ते नीरज कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

COMMENTS