उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांची कर्जमाफी; योगी सरकारचा निर्णय

उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांची कर्जमाफी; योगी सरकारचा निर्णय

उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांचे एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी पहिल्यांदाच कॅबिनेटची बैठक बोलावली होती. या बैठकीत कॅबिनेटचे अनेक मंत्री उपस्थित होते. या बैठकीपूर्वीच शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांचे एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या कर्जमाफीचा लाभ 86 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उत्तर प्रदेश सरकारला 36 हजार कोटी रुपयांची तरतूद करावी लागेल. दरम्यान, उत्तर प्रदेशातील शेतकऱयांना कर्जमाफी देण्याच्या मुद्यावरुन सरकारने हिरवा कंदील दिल्याने राज्य सरकार आता राज्यातील शेतकऱयांबाबत काय भूमिका घेते, याबाबत उत्सुकता कायम आहे.

 

COMMENTS