उदयनराजे भोसले यांना 14  दिवसांची न्यायालयीन कोठडी

उदयनराजे भोसले यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

सातारा –  खंडणीच्या गुन्ह्यात खासदार उदयनराजे भोसले सातारा शहर पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत. त्यांची वैद्यकीय चाचण्या करून कायदेशीर अटकेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले आहे.  सातारा जिल्हा न्यायालयाने उदयनराजे भोसले यांना  14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

कायदा हातात घेऊ नये संयम राखावा, असे आवाहन खासदार भोसले यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.  उदयनराजे समर्थक आणि सातारकरांकडून बाजार पेठेसह शहरातील दुकाने उत्स्फूर्तपणे बंद करण्यात आले आहे. क्रां. नाना पाटील रुग्णालय, पोवईनाका आणि शहरात पोलीस बंदोबस्तात वाढ केली आहे.

एका उद्योगजकाला खंडणी मागितल्याप्रकरणी उदयनराजेंवर गुन्हा झाला होता. त्यावर कोर्टानं त्यांना अटकपूर्व जामीन नाकारला होता. त्यानंतर गेल्या आठवड्यात चार महिन्यानंतर उदयनराजे साता-यात दाखल झाले. उदयनराजे भोसले अखेर आज सकाळी स्वत:हून सातारा शहर पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यानंतर यांची वैद्यकीय चाचण्या करून कायदेशीर अटकेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना सातारा जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.  सातारा जिल्हा न्यायालयाने उदयनराजे भोसले यांना  14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. शांतता व सुव्यवस्थेसाठी शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 

 

COMMENTS