उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे ‘गजनी’, नितेश राणेंनी उडवली खिल्ली

उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे ‘गजनी’, नितेश राणेंनी उडवली खिल्ली

भाजपसोबत सत्तेत राहूनही कधी सत्तेच्या सोयीची तर कधी विरोधाची भूमिका घेणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी एका व्यंगचित्राद्वारे खिल्ली उडवली आहे. या व्यंगचित्रातून त्यांनी ठाकरेंची तुलना ‘गजनी’ या चित्रपटातील पात्राशी करून शिवसेनेला डिवचले अाहे. या चित्रावरून शिवसेना आणि राणे यांच्यामध्ये पुन्हा एकदा जुंपण्याची शक्‍यता आहे.

सरकारला अाक्रमक इशारा देणाऱ्या व सत्तेत राहण्यासाठी पुन्हा भाजपशी जुळवून घेणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या बदलत्या भूमिकेची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नाेंद घेण्याची उपहासात्मक मागणीही राणे यांनी काही दिवसांपूर्वी केली हाेती.

 

COMMENTS