उद्धव ठाकरे  = U.T. = यू टर्न –  सुप्रिया सुळे

उद्धव ठाकरे  = U.T. = यू टर्न –  सुप्रिया सुळे

यवतमाळ – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाच्या आद्यअक्षरात  U T  आहे, त्यामुळे ते प्रत्येकवेळी यू टर्न घेतात असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी लगावला आहे. त्या यवतमाळमध्ये बोलत होत्या. शिवसेनेच्या स्थापना दिनाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यावरुन भाजपवर मतांचं राजकारण करत असल्याची टीकाही केली होती. मात्र दुस-याच दिवशी त्यांनी एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे नावाप्रमाणे ते नेहमी यू टर्न घेतात असा टोला त्यांनी लगावला.

COMMENTS