उद्योगनगरीच्या महापौरपदी नितीन काळजे यांची निवड निश्चित

उद्योगनगरीच्या महापौरपदी नितीन काळजे यांची निवड निश्चित

पिंपरी चिंचवडच्या महापौर पदासाठी भाजपकडून नितीन काळजे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय. तर उपमहापौर पदासाठी भाजपने  शैलजा मोरे यांना उमेदवारी दिली आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत भाजपकडून उमेदवारी दाखल करण्यात आली. पालिकेत भाजपचे सर्वाधिक नगरसेवक असल्यामुळे त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. 14 तारखेला निवडीची फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडूनही महापौर पदासाठी शाम लांडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय. तर उपमहापौर पदासाठी निकिता कदम यांना रिंगणात उतरवण्यात  आलय . 128 संख्याबळ असलेल्या पालिकेत भाजपचे सर्वाधिक 77 नगरसेवक आहेत. तर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच 36 एवढं संख्याबळ आहे. तर शिवसेना 9, मनसे 1 आणि इतर 5 असं संख्याबळ आहे. त्यामुळे भाजपचा विजय निश्चित आहे.

दरम्यान,भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी पालिकेच्या चाव्या आपल्या हातात ठेवायला पसंती दर्शवल्यामुळे काजळे यांची महापौरपदी वर्णी लागल्याचं बोललं जात आहे.

खरा,खोटा ओबीसी रंगली चर्चा

महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या टप्प्यात काजळे,ढाके,काटे यांची नावं भाजपकडून चर्चेत होती. यामदे खरा ओबीसी कोण याची चर्चा पहायला मिळाली. संख्याबळ कमी असतना उमेदवारी दाखल केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेला विचारलं असता आम्ही खऱ्या ओबीसी उमेदवाराचा अर्ज भरल्याचा टोला त्यांनी लगावला.

 

COMMENTS