उपराष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील 25 शिक्षकांचा सन्मान

उपराष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील 25 शिक्षकांचा सन्मान

नवी दिल्ली – राष्ट्रीय शिक्षक दिना निमित्त महाराष्ट्रातील 25 शिक्षकांना आज उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने शिक्षक दिनानिमित्त येथील विज्ञान भवनात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2016-17 वितरणाचे आयोजन करण्यात आले होते. उपराष्ट्रपतींच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह, डॉ. सत्यपाल सिंह तथा वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

नागोराव तायडे, महानगर पालिका उच्च प्राथमिक मराठी शाळा क्र.2, घाटकोपर(प.) (मुंबई), उज्ज्वला नांदखिले, जिल्हा परीषद प्राथमिक शाळा, साडेसतरा नळी, ता.हवेली (पुणे), शोभा माने, जिल्हा परीषद प्राथमिक शाळा, चिंचणी, ता. तासगांव(सांगली), तृप्ती हतिसकर, महानगर पालिका प्राथमिक शाळा, प्रभादेवी (मुंबई), सुरेश शिंगणे, जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळा, पिंपळगांव चिलमखा, पो. उंबरखेड, ता. देऊळगांव राजा(बुलडाणा), संजिव बागुल,जिल्हा परीषद प्राथमिक शाळा, सांभवे, पो. माळे ता.मुळशी (पुणे), राजेशकुमार फाटे ए.टी., जिल्हा परीषद प्राथमिक शाळा, डोंगरगांव, पंचायत समिती लाखनी (भंडारा), ज्योती बेलावळे, जिल्हा परीषद प्राथमिक शाळा, केवनीदिवे, पो. काल्हेर, ता. भिवंडी (ठाणे), अर्जुन ताकटे, जिल्हा परीषद प्राथमिक शाळा,अहेरगांव, ता. निफाड(नाशिक), रुख्मिणी कोळेकर, जिल्हा परीषद प्राथमिक शाळा, वांगी-2, ता. करमाळा (सोलापूर), रामकिशन सुरवसे, जिल्हा परीषद प्राथमिक शाळा, नागोबावाडी, ता.औसा(लातूर), प्रदीप शिंदे, जिल्हा परीषद प्राथमिक शाळा, शिलापूर, ता.जि.(नाशिक),अमीन चव्हाण, जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळा, निंभा, पो. देऊरवाडा, ता.दिग्रस (यवतमाळ), उर्मीला भोसले, जिल्हा परीषद प्राथमिक शाळा, महालदारपुरी, ता.वाशी (उस्मानाबाद), गोपाल सुर्यवंशी ,जिल्हा परीषद प्राथमिक शाळा, गंजुरवाडी, ता.जि.(लातूर) या शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

COMMENTS