उस्मानाबाद : दगाफटका टाळण्यासाठी जि.प. चे सर्व सदस्य सहलीवर; उद्या अध्यक्षपदाची निवड, उत्कंठा शिगेला

उस्मानाबाद : दगाफटका टाळण्यासाठी जि.प. चे सर्व सदस्य सहलीवर; उद्या अध्यक्षपदाची निवड, उत्कंठा शिगेला

जिल्हा परिषदेतील सर्वच पक्षाचे सदस्य सहलीवर गेल्याने नेत्यांच्या मनातील धाकधूक कायम आहे. उद्या मंगळवारी (ता. 21) जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. एकमेकांना कानोसा लागू दिला जात नसल्याने उत्कंठा शिगेला पोहचली आहे.

 

गेल्या महिन्यात जिल्हा परिषदेच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. पण, बहुमतासाठी दोन सदस्यांची गरज आहे. एकूण 55 सदस्यांमध्ये राष्ट्रवादी 26, काँग्रेस 13, शिवसेना 11, भाजप चार तर भापसेला एक जागा मिळाली आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी राष्ट्रवादीची ओढातान होत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस, शिनसेना व भाजप अशी मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

 

उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून आमदार मधुकरराव चव्हाण यांचे चिरंजीव बाबुराव चव्हाण उपाध्यक्ष मिळविण्यासाठी प्रयत्नशिल असणार आहेत. येणाऱ्या विधानसभेसाठी ते काँग्रेसचे उमेदवार मानले जातात. तर बसवराज पाटील हेही आपला मुलगा शरण पाटील यांच्या उपाध्यक्पदासाठी प्रयत्नशिल असल्याची चर्चा आहे. तर उपाध्यक्षपद इतर पक्षाकडे जावू नये, यासाठी सर्वांनाच चुचकारले जात आहे. तर इतर तिन्ही पक्षात फारसा समन्वय नसल्याने फायदा उठविण्याचे डावपेच राष्ट्रवादीने आखले आहेत.

 

 

COMMENTS