उस्मानाबाद – जिल्ह्यात राष्ट्रवादीला पुन्हा धक्का, नळदूर्गचे सर्व नगरसेवक भाजपच्या वाटेवर ?

उस्मानाबाद – जिल्ह्यात राष्ट्रवादीला पुन्हा धक्का, नळदूर्गचे सर्व नगरसेवक भाजपच्या वाटेवर ?

जिल्ह्यातील राष्ट्रवादी पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर उभी असून नळदूर्ग पालिकेतील नगरसेवक भाजपाच्या आश्रयाला जाणार असल्याची चर्चा आहे. डीपीडीसीच्या निवडणुकीतही यातील काही नगरसेवकांनी भाजपच्या पारड्यात मतं टाकल्याने या चर्चेला दुजोरा मिळत आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत नळदूर्ग येथील राष्ट्रवादीचे नेते तथा बडे उद्योजक विधानसभेसाठी इच्छुक होते. परंतु, जीवनराव गोरे यांनी तिकीट मिळविण्यात बाजी मारली. त्यामुळे नाराज उद्योजक इतर पक्षांचा शोथ घेत होते. ज्येष्ठ नेते पवार यांच्यासोबत चर्चा होऊन त्यांनी विधानसभेत माघार घेतली. पक्षाला साथ दिली. परंतु, पक्षाला विधानसभेत अपयश आले. त्यानंतर झालेल्या पालिकेच्या निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळवित पालिका ताब्यात घेतली. दरम्यान जिल्ह्यातील पक्षनेतृत्वावर नाराज होत त्यांनी भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भूम पालिकेत संजय गाढवे यांनी सर्वच नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. त्याप्रमाणे त्यांचाही भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे डीपीडीसीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराची मते फुटली. नळदूर्ग येथील राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी भाजपच्या उमेदवाराला पसंती दिल्याचे बोलले जात आहे.

 

COMMENTS