उस्मानाबाद : जि.प. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काय घडल्या पडद्यामागच्या हालचाली ?

उस्मानाबाद : जि.प. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काय घडल्या पडद्यामागच्या हालचाली ?

जिल्हा परिषदेत अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपद मिळविण्यासाठी राष्ट्रवादीला दोन सदस्यांची गरज होती. त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू होती. सेनेचे दोन सदस्यांना गैरहजर ठेवण्यात राष्ट्रवादीला १० दिवसांपूर्वीच यश आलं होतं. उमरग्यात शिवसेनेचा लढा भाजप अन काँग्रेससोबत आहे. त्यात या दोघांनी मिळून खासदार पुत्राला निवडणुकीत धुळ चारलेली. अन याच विरोधकांच्या सोबत सत्तेत सहभागी व्हावे, यासाठी प्रा. तानाजी सावंत, ओमराजे निंबाळकर गट आग्रही होता. पण उमरग्या शिवसेनेला हे समिकरण परवडणारं नव्हतं. त्यामुळे अखेर ड्रामा करीत उमरगा गटाने राष्ट्रवादीला मदत केली. अन २० वर्षांपूर्वीच्या राष्ट्रवादी व शिवसेनेच्या अंतर्गत आघाडीची आठवण झाली. यातूनच उमरगा सेनेने काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदाला आसमान दाखविले. तरीही भाजप शिवसेनेसोबत होती. कारण सेना अध्यक्षपाचा उमेदवार कळंब तालुक्यातून देण्याचे निश्चित झाले होते. उमरगा सेना मदत करीत नसल्याचे लक्षात येताच कळंब परंडा शिवसेना एकत्र आली अन अध्यक्षपदाचा उमेदवार भूमचा निश्चित झाला. पण, भूमचा अध्यक्ष हे भाजपच्या आमदाराला रुचणारे नव्हते. त्यामुळे भाजपने एैनवेळी राष्ट्रवादीच्या गोटात जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तिन्ही पक्षांची मोट फिस्कटली. भाजप शिवसेना निवडणुकीनंतर एकमेकांना पाण्यात पाहत होते. एकमेकात समज गैरसमज होते. त्यात सेनेतअंतर्गत एकवाक्यता नव्हती.

राष्ट्रवादी सर्वच घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवून होती. भाजपसह सेनेच्या एका गटाला गोंजारणे राष्ट्रवादीने सुरूच ठेवलेे. त्यामुळे भाजपसेना कायम राष्ट्रवादीच्या दबावाखीली राहिले. भाजप सेनेने एकमेकांना पाण्यात पाहिल्याने एकाचे अध्यक्ष तर दुसऱ्याचे उपाध्यक्षपदाचे स्वप्न राष्ट्रवादीने अलगतपणे हिरावून घेतले. अन आमदार राणाजगजितसिंह पाटील विजयाचे हिरो ठरले.

COMMENTS